वन महोत्सव हा वृक्ष संरक्षण महोत्सव म्हणून साजरा करणार - सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 26 - राज्यातील वनाच्छादित क्षेत्र परत निर्माण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेला वृक्ष लागवडीचे काम मिशन मोडवर करावे लागणार आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन, समन्वय तसेच लोकसहभाग महत्त्वाचा असून, स्वयंसेवी, धार्मिक, शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांचा सहभाग घेऊन राज्यात 4 कोटी वृक्ष लावण्यात येणार असून, हा वनमहोत्सव वृक्ष संरक्षण महोत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यात चार कोटी वृक्षलागवडीसंदर्भात विभागीय स्तरावर करण्यात आलेल्या नियोजनासंदर्भातील आढावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
नागपूरातील राजीव गांधी राष्ट्रीय बौध्दिक संपदा प्रबंधन संस्थेच्या सभागृहात आयोजित बैठकीस खासदार सर्वश्री रामदास तडस, अशोक नेते, आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, प्रकाश गजभिये, संजय धोटे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. भगवान, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, नगराध्यक्ष, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. राज्यात 1 ते 7 जुलै हा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असून, जिल्हानिहाय वृक्षारोपणाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षारोपणासंदर्भात जनतेच्या हृदयात वृक्ष लावण्याच्या मोहिमेचे बीजारोपण करण्यासोबतच लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करा. तसेच जीवनाचा प्रत्येक क्षण वृक्षलागवड करुन साजरा करण्याचा संकल्प करा, असे आवाहन केले.
वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर त्यासाठी कमीत कमी 400 कोटींपेक्षा जास्त झाडे लावावी लागतील. हे काम एक व्यक्ती करु शकत नाही, यासाठी लोकसहभागातून आपले ध्येय साध्य करता येणार आहे. ही सामूहीक जबाबदारी आहे. चार कोटी वृक्षलागवडीच्या या मिशनकडे इव्हेंट म्हणून आपल्याला पाहता येणार नाही. यावर्षी 1 ते 7 जुलै हा वृक्षारोपण सप्ताह म्हणून साजरा करायचा आहे. तर पुढील वर्षी तो पंधरवडा म्हणून साजरा करत वसुंधरेला हिरवा शालू पांघरवून गतवैभव प्राप्त करुन देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिका-यांना उद्देशून सांगितले. यावर्षी सप्ताह तर पुढील वर्षातील सप्ताहात वृक्ष लागवडीच्या मानसिकतेचे बीजारोपण करुन त्यांचा लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना केल्या. तसेच बदली झाल्याच्या ठिकाणी प्रत्येक अधिका-यांने पदभार स्विकारताना एक वृक्ष लावावा. पावसाळ्यात वृक्ष देत स्वागत करावे, त्यानंतर वर्षभर पुष्पगुच्छ न देता पुस्तके भेट देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करताना वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य, भित्तीपत्रके यांचाही उपयोग करण्याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वन विभागाचे सचिव विकास खरगे यांनी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासंदर्भात म्हणाले की, वनविभागाच्या अखत्यारितील जागांसोबतच विविध संस्थेच्या ताब्यातील जागांवर लोकसहभागातून वृक्षलागवड करता येईल. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील रानमळा गावातील सरपंचाचे उदाहरण देत नवजात वृक्ष, शुभमंगल वृक्ष, स्मृती वृक्ष, आनंद वृक्ष देण्याचे अनुकरण करण्यास सांगितले. या वृक्षलागवडीला भावनिक नाते निर्माण झाल्याने 100 टक्के वृक्ष संगोपन केले जाते. त्यामुळे हा उपक्रम ग्रामीण तसेच नागरी दोन्ही भागांमध्ये राबविता येईल, असे त्यांनी सांगितले.
हा उपक्रम राबविताना ग्रामपंचायती, नगर परिषद, नगर पालिका आणि महानगरपालिकांसोबतच स्वयंसेवी संस्थांनी वृक्षांची रोपे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले. तसेच पडीक जमीन, नापिक जमीन, जलयुक्त शिवार योजनेतील नाला रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या माध्यमातून तयार झालेल्या बांधांवरही वृक्षलागवड करता येणार आहे. आंबा, कडूनिंब, मोह, आदी फळांच्या वृक्षासोबत शेवगा, बांबू, रानमेव्याची रोपेही नर्सरीतून उपलब्ध करुन देण्यावर भर देण्याचे श्री. विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.