भगूर येथे रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव सोहळा
नाशिक, दि. 27 - प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांची प्रमुख उपस्थिती हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ठय आहे, अशी माहिती जन्मोत्सव समितीचे निमंत्रक तथा प्रदेश भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि भाजपाचे महानगर अध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची ध्येयासक्ती आणि त्यांचे राष्ट्रप्रेम आजही कोट्यावधी भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्तीचा अंगार कायम ठेवून आहे. या उत्सवाच्या निमित्ताने त्याच्या जन्मस्थळी भगूर येथे त्यांची पुस्तके, त्यांच्यावरील गीते, त्यांच्या विचारांचा पुनरुच्चार, त्यांच्यावरील छायाचित्र प्रदर्शन यांचा आविष्कार उपस्थितांना घडणार आहे. सर्व सावरकरप्रेमींनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी, असे आवाहनही लाड आणि आ.बाळासाहेब यांनी केले.
या सोहळयाचे उद्घाटन रविवार सकाळी 9.30 वाजता भगूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अग्निकुंड प्रज्वलित करून करणार आहेत. त्यानंतर ते स्वातंत्र्यवीर. वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आयोजित सावरकरांच्या ‘शतजन्म शोधिताना’ हा गीतांचा कार्यक्रम सकाळी 8.30 वाजता होईल.
सांगता सोहळयानिमित्त ‘सायंकाळी 4 ते 7 या वेळेत नाशिक येथील कालिदास कलामंदिर येशालेय शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानाचे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गीता उपासनी, अरविंद कुलकर्णी आदी वक्ते सावरकरांवरील आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर रात्री सावरकर दर्शन प्रतिष्ठान निर्मित ‘अनादी मी अवध्य मी’ हा गीतांचा कार्यक्रम होणार आहे.’ असे भाजपा प्रदेशचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. सकाळच्या भगूर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी संस्कार भारतीतर्फे रांगोळी काढली जाणार असून यावेळी सनई चौघडा वादनही होणार आहे.