संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ’राधा’चा मृत्यू
मुंबई, दि. 22 - बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ’राधा’ नावाच्या मादी बिबट्याचा वृद्धापकाळाने शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. ती 17 वर्षांची होती.
2004 मध्ये कोल्हापूरमधील राधानगरी उद्यानातून तिला आणण्यात आले होते. मात्र गेल्या काही वर्षात ती आजारी होती. गेले तीन आठवडे तिच्यावर उपचार सुरू होते. तिने चालणे-फिरणेही बंद केले होते. बॉम्बे व्हेटर्नरी महाविद्यालयाकडून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर तिच्या मृत्यूमागील विस्तृत कारण समजेल. मात्र तिचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे उद्यान व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.