वीरभद्र सिंह यांना जामीन देण्यास ‘सीबीआय’चा विरोध
सिमला, दि. 30 - बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या जामिनाच्या याचिकेवरील निर्णय पटियाला हाऊस न्यायालयाने राखून ठेवला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. वीरभद्र सिंह हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीच भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये, असे केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात सांगितले. सिंह यांना वैद्यकीय कारणांमुळे जामीन मंजूर करण्यात येऊ नये, असेही विभागाकडून सांगण्यात आले. विभागाने सिंह यांच्याविरुद्ध न्यायालयात साक्षीदार देखील सादर केले याचकारणास्तव न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.