पनामा कागदपत्र घोटाळ्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या मुलाची चौकशी
इस्लामाबाद, दि. 30 - पनामा कागदपत्र घोटाळ्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा मुलगा हुसैन नवाज यांची चौकशी करण्यात येत आहे. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या संयुक्त तपास पथकाने ही चौकशी सुरु केली आहे. शरीफ यांच्या कुटुंबीयांच्या विदेशी व्यापारातील गुंतवणुकीचा सध्या तपास करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर हुसैन नवाज यांची चौकशी करण्यात येत आहे.
संयुक्त तपास दलाकडून करण्यात येणा-या चौकशी दरम्यान हुसैन यांच्यासह त्यांचे वकीलही उपस्थित होते.मात्र, न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतरच वकीलांना हुसैन याची मदत करता येऊ शकते असे तपास पथकाने सांगितले. त्यानंतर जवळपास 2 तास पथकाने हुसैन यांची चौकशी केली.
चौकशी दरम्यान तपास पथकातील दोन अधिका-यांनी योग्य वर्तवणूक न केल्याचा आरोप करत हुसैन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.