गायीची कत्तल केल्याप्रकरणी युवा काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांचे पक्षातून निलंबित
तिरुवनंतपूरम, दि. 30 - केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी गायीच्या वासराची कत्तल केल्याप्रकरणी आज युवा काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी कन्नूर युवा काँग्रेसचे अध्यक्ष राजील माकुट्टी यांच्यासह तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली होती.
काँग्रेसच्या तिघांनी गायीच्या एका वासराला सार्वजनिक ठिून त्याची कत्तल केली. त्यानंतर या वासराचे मांस लोकांना वाटण्यात आल्याचे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. कॉग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. पर्यावरण मंत्रालयाकडून आठवडी बाजारातील दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यावरुन केरळमध्ये वादविवादाचे सत्र सुरुच आहे.