रत्नागिरी जिल्ह्यात चित्रित हाक चित्रपटाचे आजपासून प्रदर्शन
रत्नागिरी, दि. 12 - कोकणच्या निसर्गसौंदर्याची भुरळ केवळ देश - विदेशातील पर्यटकांनाच आहे असे नव्हे, तर मराठी चित्रपट कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना देखील कोकणचे सौंदर्य नेहमी साद घालते. कोकण ही जन्मभूमी असणारे ख्यातनाम कलाकार अरुण नलावडे आणि कोकणवर विशेष प्रेम करणारे दिग्दर्शक रमेश मोरे यांच्या कल्पनेतून साकारलेला हाक हा चित्रपट उद्या (दि. 12 मे) प्रदर्शित होत असून कोकणातील कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून देणारा हा चित्रपट पूर्णत: रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यात चित्रित झाला आहे.
अंजली नलावडे निर्मित हाक या चित्रपटात अरुण नलावडे, ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त, सुहासिनी देशपांडे, अनिल गवस, नीता गोखले, वरुण उपाध्याय, अशोक परब याबरोबरच कोकणातील प्रथितयश कलाकार डॉ. भगवान नारकर, सौ. अनुराधा नारकर लांज्याचे अमोल रेडीज, शेखर जोशी, श्रीकांत पाटील, शरद चव्हाण, मंगेश डोंगरे, सावंत, श्रीमती पांचाळ, डॉ. अश्विनी नारकर आणि मयूरेश बामणे यांनी आपल्या भूमिका दर्जेदारपणे सादर केल्या आहेत.
रमेश मोरे या निर्माता दिग्दर्शक व्यक्तिमत्त्वाचे कोकणवर विशेष प्रेम आहे. आजवर त्यांनी कोकणच्या विविध भागात चित्रीकरण करून एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट, लघुपटांची निर्मिती केली आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निर्माते, दिग्दर्शक रमेश मोरे यांनी कोकणची सांस्कृतिक परंपरा असलेल्या नमन या ग्रामीण तरीही लोकप्रियतेच्या अफाट शिखरावर असणार्या नृत्याविष्कारावर नुकताच एक लघुपट तयार केला असून तोदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. कोकणवर नितांत प्रेम असणार्या रमेश मोरे यांच्यावरच हाक चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या चित्रपटाबाबत बोलताना ख्यातनाम कलाकार आणि संगमेश्वर तालुक्याचे सुपुत्र अरुण नलावडे म्हणाले की, कोकणचे ग्रामीण जीवन साधे तरीही नीटनेटके आणि अगत्याचे असल्याने कोकणात विशेषतः ग्रामीण भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे आम्ही ठरवले. कोकणातील कलाकारांकडे मुळातच अभिनयाची उत्तम कला असल्याने येथील कलाकारांनादेखील आपला अभिनय सादर करण्याची संधी मिळावी अशी आमची मनोमन इच्छा होती. कोकणातील जवळपास 15 पेक्षा अधिक कलाकारांना या चित्रपटात अभिनयाची संधी देण्यात आली आहे. डॉ. भगवान नारकर, अमोल रेडीज यांच्या उत्तम अभिनयासह बालकलाकार अपूर्व खातू याचे अरुण नलावडे यांनी विशेष कौतुक केले. दिग्दर्शक राजदत्त हे हाक चित्रपटात विशेष भूमिका करत असून त्यांची ही भूमिका हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य असल्याचे निर्मात्या अंजली नलावडे यांनी सांगितले. हा चित्रपट कोकणवासीयांच्या मनात तर घर करणारच आहे मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रेक्षक हाकच्या प्रेमात पडेल असा विश्वास अरुण नलावडे यांनी व्यक्त केला आहे.