खून प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश
नांदेड, दि. 28 - 5 मे आणि 10 या या दोनदिवशी नगीनाघाट येथे झालेल्या दोन खून प्रकरणातील आरोपींना नांदेड पोलीसांनी अत्यंत चाणाक्षपणा दाखवत एकाला जेरबंद केले असून, दुसरा कांही तासातच पोलिसांच्या ताब्यात येईल अशी शक्यता आहे. पकडलेल्या एकाला वजिराबाद पोलिसांनी आज प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एन.एस.मिसळ यांच्या समक्ष हजर करुन पोलीस कोठडी मागितली असता त्या मारेक-याला 30 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. नगिनाघाटवर झालेले दोनही खून फक्त दरोडा टाकण्यासाठी झालेले आहेत.
5 मे 2017 रोजी एक अनोळखी 30 ते 32 वर्षीय युवक मयत अवस्थेत पोलीसांना नगिनाघाट जवळच्या गोदावरी तटावर सापडले. याबाबत पोलीस हवालदार अशोक गित्ते यांच्या तक्रारीवरुन अनोळखी माणसाचा अज्ञात मारेक-यांनी खून केल्याची तक्रार दाखल झाली. त्यानंतर पाचच दिवसात 10 मे 2017 रोजी सकाळी दुस-या एका युवकाचा मृतदेह सापडला. त्या युवकाची कांही वेळात ओळख पटली. त्याचे नाव आशिष भालचंद्र काटोले असे होते. त्याची आई निर्मलाबाई काटेले यांच्या तक्रारीवरुन अज्ञात मारेक-यांनी त्यांचा मुलगा आशिष काटोलेचा खून केल्याचा गुन्हा दाखल झाला. 5 दिवसात दोन खून झाले त्यातील एक मयत आजही अनोळखी आहे. आणि या खूनांचा तपास लागत नाही. यामुळे पोलीसांसमोर हे मोठे आव्हान होते. पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा, अप्पर पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप गुरमे यांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद दिघोरे, पांडुरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक वैभव नेटके, शिरसेवाड यांनी आजपर्यंत भरपुर परिश्रम घेतले. मारेक-यांनी मयत माणसांचे मोबाईल नेले असतील. यावर काम केले. सोबतच कोणी पंचाबचा माणूस हे कृत्य करणारा आहे का याचा शोध घेण्यासाठी पंजाब पेालीसांशीही संपर्क साधला. पोलीसांच्या गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी काल एका माणसाला अटक केली. त्याचे नाव जसवंतसिंघ उर्फ जस्सा महेंद्रसिंघ रा.शाहदा गल्ली नं.2 अमृतसर पंजाब असे आहे. पोलिसांचे एक पथक पंजाबकडे गेले आहे. जस्सा दुसरा साथीदार ते आणणार आहेत. पंजाब पोलीसांनी त्यास तिथे पकडले आहे.
या प्रकरणातील दुसरा मयत आशिष काटोले याच्या मोबाईल नंबर माहित असल्याने पोलीसांनी तांत्रिकदृष्ट्या त्या पध्दतीने शोध घेतला आणि सध्या तो मोबाईल सुरू असल्याने मारेक-यांना पकडणे सहज शक्य झाले. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी कर्नाटक राज्यातील बिदर येथे सुध्दा कांही जणांचे खून करून त्यांची लुट केली असल्याचे सांगण्यात आले. आज वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद झोटे, पोलीस कर्मचारी गजानन कदम, भारत आणि मधूकर आवातिरक यांनी जसवंतसिंघ उर्फ जस्सा महेंद्रसिंघ यास प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एन.एस. मिसळ यांच्या समक्ष उभे करुन खून करण्याचा उद्देश काय, कोणत्या हत्त्याराने खून केला या बद्दलची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. युक्तिवाद ऐकून न्यायाधिश मिसळ यांनी मारेकरी जसवंत उर्फ जसा यास दि.30 मे 2017 पर्यंत असे चार दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.