बेलापूर, वाशी, कौपरखैरणे व घणसोली विभागात अतिक्रमण विरोधी धडक कारवाया
नवी मुंबई, दि. 28 - नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, मार्जिनल स्पेसेस, होर्डींग-बॅनर्स विरोधात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार धडक मोहिमा राबविल्या जात आहेत. या अनुषंगाने बेलापूर विभागात सेक्टर 8 बी, सी.बी.डी. संभाजी नगर येथील नाल्याजवळच्या 25 अनधिकृत झोपड्यांवर धडक कारवाई करून झोपड्या निष्कासित करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे वाशीगांव येथील स्मशानभूमी लगतच्या 35 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करीत झोपड्या निष्कासीत करण्यात आल्या. तसेच सेक्टर 4 वाशी आणि नेरुळ स्टेशनचा पूर्व ह्न पश्चिम परिसर व पुल याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून फेरीवाले हटविण्यात आले व सामान जप्त करण्यात आले.
अशाचप्रकारे कौपरखैरणे विभागात सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी संयुक्तपणे सेक्टर 3 प्लॉट नं. 17 वर असलेल्या अनधिकृत स्टॉलवर धडक कारवाई केली व नॉर्थ पाँईट स्कुल समोरील 1381.50 चौ.मी.ची जागा मोकळी केली. तसेच सेक्टर 1 ए येथे प्लॉट क्र. 34 ए वरील बांबुचे गोडाऊन म्हणून वापरात असलेल्या अनधिकृत कच्या शेडवर कारवाई करण्यात आली. सिडकोचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री. एस.एस. पाटील यांनी कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे व संबंधित सिडको, महापालिका अधिका-यांसमवेत ही कारवाई केली.
त्याचप्रमाणे घणसोली विभागात सदगुरू हॉस्पीटल मागील रस्त्यांवर बंद अवस्थेत असलेल्या गाड्या उचलण्यात आल्या. डी-मार्ट विभागात मार्जीनल स्पेस अनधिकृत वापराबाबत धडक मोहीम हाती घेण्यात आली. सेक्टर 4 येथील दुकानांवर मार्जीनल स्पेस वापराबाबत कारवाई करून 10 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र अतिक्रमणमुक्त असावे तसेच येथील रस्ते व पदपथ हे नागरिकांना रहदारीसाठी व वाहतुकीसाठी खुले असावेत या भूमिकेतून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे प्र. उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. प्रियांका काळसेकर व वाशी विभागाचे विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके तसेच कौपरखैरणे व घणसोली विभागाचे सहा.आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे आणि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी डंपर, जे.सी.बी. या उपकरणांच्या सहाय्याने पोलीस विभागाच्या मदतीने ही धडक मोहीम पार पाडली. यापुढील कालावधीत महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.