पवार यांनी महापौरपदाची सूत्रे स्विकारली
लातूर, दि. 28 - माजी उप महापौर सुरेश पवार यांनी आज लातुरच्या महापौरपदाची सुत्रे हाती घेतली. पहिल्यांदाच मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाने पवार यांना कामांची अनेक आव्हाने पेलवावी लागणार आहेत. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभाजी पाटील निलंगेकर यांना ते देतात. या सोबतच पाणी, कचरा आणि वीज व्यवस्था सुधारण्यावर आपला भर राहील असं महापौर सुरेश पवार सांगतात. शहरातील पाणी, रस्ते, कचरा आदी प्रश्नांबाबत लोकांना हवं त्या पद्धतीने, लोकांना आवडेल त्या पद्धतीनं कामे करु, आपण सुरळीत कामे केल्यास कोण काय अडचण करतंय याला महत्व येत नाही, आज काही सदस्यांनी कोंडीत पक्डण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही लोकांनी कामांसाठीच निवडून दिले आहे. त्यांनीही योग्य भूमिका घेऊन सहकार्य करावं असं आवाहन सुरेश पवार यांनी केले.
