औरंगाबाद विभागाचा 89 टक्के निकाल
औरंगाबाद, दि. 31 - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या यंदाच्या निकालांमध्येही मुलींनीच बाजी मारली. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षेच्या निकालाची विभागवार माहिती देण्यात आली. त्यानुसार बारावीच्या परीक्षेत औंरगाबाद विभागात एकुण 89.50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलांची संख्या 86.65 टक्के तर मुलींची संख्या 93.05 टक्के इतकी आहे.
तर विभागनिहाय विचार करायचा झाल्यास कोकणातून सर्वाधिक 95.20 टक्के विद्यार्थीउत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना हे निकाल दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहेत. तर 9 जूनला विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत गुणपत्रिका मिळतील. सकाळी 11 वाजता गुणपत्रिका शाळेपर्यंत पोहचवण्यात येतील. त्यानंतर तीन वाजल्यापासून शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप होईल. तर 31 मे ते 9 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्ससाठी विद्यार्थ्यांना 400 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल.