सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला 54 लाखांचा गंडा
सांगली, दि. 26 - बनावट सोने तारण घेऊन 54 लाख रूपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पेठ, रेठरे धरण व ओझर्डे या तीन शाखांच्या शाखाधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. रामदुर्ग यांनी दिले. याप्रकरणी सोने तारणाची सत्यता तपासणी व मूल्यांकन करणार्या सराङ्गासह आठजणांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यात सराफ सचिन बळवंत पोतदार, माधुरी सचिन पोतदार, महेश बळवंत पोतदार, बळवंत नारायण पोतदार, कुमार भीमराव शेलार, लक्ष्मण नानासाहेब मदने व भारत सदाशिव करे (सर्व रा. पेठ, ता. वाळवा) व सुशांत अनिल सुतार (रा. इस्लामपूर, ता. वाळवा) या आठजणांचा समावेश आहे. याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी आनंदराव संपकाळ यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सचिन पोतदार याने या आठजणांच्या नावावर 22 खात्यावर अडीच किलो बनावट दागिने ठेवून ही फसवणूक केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पेठ, रेठरे धरण व ओझर्डे या तीन शाखांकडे सोने तारणाची सत्यता तपासणी व मूल्यांकनाचे काम सचिन पोतदार करीत होता. त्याआधारे त्याने स्वतःसह पत्नी, भाऊ व वडिलांसह अन्य चार मित्रांच्या नावावर खोटे सोने ठेवून जिल्हा मध्यवर्ती बँकेची 53 लाख 84 हजार 300 रूपयांची फसवणूक केली आहे. त्यात स्वतःच्या नावावर तीन लाख 65 हजार 800 रूपये, भाऊ महेश पोतदार याच्या नावे 12 लाख 94 हजार रूपये, पत्नी माधुरी पोतदार हिच्या नावे नऊ लाख 30 हजार, तर वडील बळवंत पोतदार यांच्या नावावर एक लाख 99 हजार रूपयांचे कर्ज उचलले आहे. उर्वरित रक्कम अन्य चार मित्रांच्या नावावर घेतली आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत ही फसवणूक सचिन पोतदार याने केल्याचे स्पष्ट होत आहे. आनंदराव संकपाळ यांनी दि. 5 नोव्हेंबर 2016 रोजी रेठरे धरण शाखेची तपासणी केली असता त्यांना सोने तारण कर्जातील सोने बनावट असल्याचा संशय आला होता. त्यांनी ते दागिने इस्लामपूर शाखेकडील सराफ संभाजी देसाई यांच्याकडून तपासून घेऊन खात्री केली असता ते सोने बनावट असल्यावर शिक्कामोर्तब झाले. सचिन पोतदार हा पेठ व ओझर्डे या दोन शाखांकडेही काम करीत होता. त्यामुळे त्या दोन शाखेतही तपासणी केली असता काही खात्यांवर खोटे दागिने ठेवून कर्ज उचलल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार सचिन पोतदार याच्यासह अन्य आठजणांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.