सांगली जिल्हा परिषद कन्नडबहुल गावात 21 मराठी शाळा सुरू करणार
सांगली, दि. 26 - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या सीमाभागातील कन्नडबहुल भागातील 21 ठिकाणी प्राथमिक मराठी शाळा सुरू करण्याचा ठराव सांगली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत राज्य शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून येत्या शैक्षणिक वर्षापासून या शाळा सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.
जिल्हा परिषद स्थायी समितीची मासिक सभा संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेस जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती श्रीमती प्रा. सुषमा नायकवडी, अरूण राजमाने, तम्मणगौडा रवी, ब्रम्हदेव पडळकर व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने आदी उपस्थित होते.
कर्नाटक राज्यातील लोकप्रतिनिधी यांनी सभागृहात जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्याच्या वादग्रस्त विषयानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे संग्रामसिंह देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले. जत तालुक्याच्या सीमावर्ती कन्नडबहुल भागात आता पुन्हा मराठी माध्यमाच्या 21 शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळावी, यासाठी राज्य शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.