पेट्रोलपंप दरोड्यातील 3 फरार आरोपी गावठी पिस्टलसह पोलिसांच्या ताब्यात
नाशिक, दि. 26 - नाशिक गुन्हेशाखा पोलीस युनिट क्र.2 च्या पोलनाशिकच्या उपनगरपोलीस हद्दीतून विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल विक्रीस घेऊन आलेल्या तिघांना सापाळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल तसेच एक 220 सीसी पल्सर मोटार सायकल असा एकूण 1 लाख 10 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, नाशिकच्या उपनगरपोलीस स्टेशनच्या हद्दीत के.जे.मेहता येथे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या 3 गुन्हेगारांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपी महेश चिंधू उर्फ चिंतामण आंधळे, वय 23 संगमेश्वर नगर नाशिकरोड, महेश पांडुरंग लांडगे वय वर्ष 24 रा.वडगाव पिंगळा, सुमित अविनाश निरभवणे वय 22 रा. तारण तलावजवळ नाशिकरोड याचे विरोधात उपनगरपोलीस स्टेशन येथे भाडावी कलम 2 (25), 5 (25) भादवि कलम 34 प्रमाणे अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हेगारांची कसून तपासणी केली असता त्यांनी गेल्या 20 दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील पेट्रोल पंप येथे दरोडा टाकली असल्याची कबुली दिली याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सदर कामिगिरी पोलीस निरीक्षक नी.सु.माईनकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निर्क्सक रविंद्र साळुंखे, संजय तांदुळवाडकर, गंगाधर देवडे, रवींद्र बागुल यांनी केली.