21 जूनला होणार कोपर्डी प्रकरणातील आरोपींचे अंतिम जबाब
अहमदनगर, दि. 26 - संपूर्ण राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणाच्या सुनावणीत सरकार पक्षाच्या वतीने साक्षी-पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाले असून जून महिन्यात 21 ते 23 रोजी होणार्या सुनावणी दरम्यान या प्रकरणातील तीनही आरोपींचे अंतिम जबाब न्यायालयात नोंदविले जाण्याची शक्यता आहे.
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले होते.पोलीसांनी प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण केला.सरकारच्या वतीने या प्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.या प्रकरणाची सुनावणी अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुरू आहे.कोपर्डी प्रकरणाची सुनावणी वेगाने होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात असतांना आरोपींच्या वकीलांनी खटला चालवितांना वेळकाढूपणा केल्याने कामकाज थोडे लांबले असे अॅड.निकम यांनी म्हटले आहे.कोपर्डी प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 31 साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले.या सर्व साक्षीदारांची सरतपासणी व उलट तपासणी पूर्ण झाली आहे.आता कोपर्डी प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ते 23 जून या कालावधीत होणार आहे.त्यावेळी मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे,संतोष भवाळ व नितीन भैलुमे या तिघांचे अंतिम जबाब न्यायालया समोर नोंदविले जाण्याची शक्यता आहे.