Breaking News

परकीय चलन साठा 379 अब्ज डॉलरवर; गाठला उच्चांक

मुंबई, दि. 28 - देशाचा परकीय चलन साठा 379 अब्ज 31 कोटी डॉलरपर्यंत पोचला असून नवा उच्चांक गाठला आहे, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. 19 मे रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठ्यात 4 अब्ज 3 कोटी डॉलरची चांगली वाढ झाली आहे. परकीय चलनात वाढ झाल्याने चलन साठ्यातही वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात 44 कोटी 36 लाख डॉलरने घसरण होऊन 375 अब्ज 27 कोटी डॉलरवर पोचला होता. रिझर्व्ह बँकेने आढावा घेतलेल्या आठवड्यात एकूण चलन साठ्यात 3 अब्ज 99 कोटी डॉलरने वाढ होऊन 355 अब्ज 97 कोटी डॉलरवर पोचला होता.