Breaking News

अफगाणिस्तान सैन्याच्या छावणीवर तालिबानचा हल्ला, 15 सैनिकांचा मृत्यू

काबूल, दि. 28 - दक्षिण अफगाणिस्तानमधील कंधार प्रांतातील सैन्याच्या एका छावणीवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 15 सैनिक मारले गेल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. 
एका आठवड्याभरातील ही दुसरी घटना असून दुसर्‍या एका छावणीवर झालेल्या हल्ल्यात 10 सैनिक मारले गेले होते. गुरुवारी रात्री झालेल्या हल्ल्यात 15 सैनिक मारले गेले असून 5 सैनिक जखमी झाले असल्याची माहितीही देण्यात आली. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 20 सैनिक मारले गेले असल्याचा दावा एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला. दरम्यान, गेल्या आठवड्यातही दहशतवाद्यांनी काबूल बँकेच्या एका स्थानिक शाखेवर केलेल्या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता.