Breaking News

राजस्थानमध्ये दारु घरपोच पोहोचवण्यासाठी मुलांचा वापर

बीकानेर, दि. 28 - उत्तर राजस्थानमधील बीकानेरमध्ये दारु घरपोच पोहोचवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना कामावर ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 
शालेय विद्यार्थी आपल्या उन्हाळी सुट्टीत पैसे मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थी हे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. मी माझ्या बहिणीची सायकल दारु घरपोच पाठवण्यासाठी वापरतो, असे हे काम करणार्‍या एका 14 वर्षीय मुलाने सांगितले. ही सायकल सरकारकडून मुलींना शाळेत जाण्यासाठी भेट म्हणून दिली जाते. अनेक अल्पवयीन मुले दारु घरपोच देण्याचे काम करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून दारु पोहोचवण्याचे काम करून घेणे हा गुन्हा असून याविरोधात कारवाई करणार असल्याचे बीकानेर जिल्ह्याचे वाटप अधिकारी ओ. पी. पानवर यांनी सांगितले.
पाच कि.मी.पर्यंत शाळा असणार्‍या मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राजस्थान सरकार केशरी रंगाच्या सायकल देण्याचा उपक्रम राबवला. राज्याच्या शैक्षणिक विभागाने सुमारे 2.95 लाख सायकल वाटप करण्याचा निर्णय घेतला असून आत्तापर्यंत 16 जिल्ह्यात 50 हजार सायकल वाटप करून झाल्या आहेत. या प्रत्येक सायकलची किंमत सुमारे 2 हजार 937 आहे.