मृतकाच्या नातेवाईकांकडून डॉक्टर,पोलिसाला मारहाण, 11 आरोपीना अटक
ठाणे, दि. 29 - गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या वासू दत्ताप्पा बेलगिरे रुग्णाचा पूर्वीच मृत्यू झाल्याचे कर्तव्यावरील डॉक्टारांनी घोषित केले. दरम्यान आतापर्यंत रुग्ण श्वास घेत होता लगेच कसा मृत झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना जबरदस्तीने तपासणी करण्यात सांगताच त्याला नका देणार्या डॉक्टरांना मारहाण करीत बचावासाठी आलेल्या पोलीस हवालदार याना मारहाण करण्यात आली. रंगाच्या भारत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलिसांनी मात्र 11 जणांवर गुन्हा दाखल करून शुक्रवारी पहाटे अटक केली आहे.
गुरुवारी रात्री 11-30 वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील टायटन या खाजगी रुग्णालयात वासू दत्ताप्पा बेलगिरे याना अत्यावस्थेत आणण्यात आले. परंतु डॉकटर अनिल पाटील यांनी तपासणी करीत रुग्ण मृत झाल्याचे घोषित केले. रुग्ण आतापर्यंत जिवंत होता. लगेच कसा मृत झाला. पुन्हा तपासणी करा असा जबरदस्तीने तगादा लावत सर्टिफिकेट द्या अशा मागणीला नकार देणार्या डॉक्टर पाटील याना मारहाण करण्यात आली. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या पोलीस हवालदार जहाँगीरअली उम्र अली सैयद यांनाही मारहाण करण्यात आली. रुग्णाचे आप्तेष्ट आणि नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करीत अतिदक्षता विभागाची ही तोडफोड केल्याची तक्रार चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सय्यद यांनी केली. घटनास्थळी पोलीस फौजफाटा येताच त्यांनी रुग्णाचे नातेवाईक बाबा पांडुरंग वाघमारे, सागर आसाराम गरगड़े, साईराम आसाराम गरगड़े, रवि अहिरे, सागर चव्हाण, शंकर कुडेकर, सचिन चव्हाण, सोमनाथ सोंगाड़े, विनोद भानुशाली, परमेश्वर राउत उत्फ पप्या और सलीम सय्यद सगळे अमराई झोपडपट्टी, मोजेस कंपाउंड , कापुर बावड़ी ठाणे यांच्या विरोधात भादंवि 143, 147, 149, 323, 504, 506 सहित क्रिमिनल एक्ट कलम 7 सहित महाराष्ट्र वैद्कीय सेवा अधिनयम वैद्कीय सेवा संस्थाच्या कलम 4 अन्वये गुन्हा ल करून अटक करण्यात आली अधिक तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे करीत आहेत.