शेतकरी प्रश्न मार्गी लावून होणार ‘समृद्धी’ - मुख्यमंत्री
नाशिक, दि. 29 - समृद्धी महामार्गाची 670 किमी मोजणी पूर्ण आहे. शेतकरी प्रश्न मार्गी लावून होणार ‘समृद्धी’ महामार्ग पूर्ण होणार आहे. अजून मोजणीच पूर्ण नाही झाली तर इतके-इतके शेतकरी बधिक असल्याची माहिती मिळणार कशी असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नाशिक शहर विकासासाठी दत्तक घेतलेले पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिका निवडणुकीनंतर आज प्रथमच नाशिक दौर्यावर आले होते. नाशिक महापालिकेला पाणी योजनेसाठी जो निधी अपुरा पडेल तो राज्य सरकारकडून उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
नाशिकच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आज पहिली बैठक याठिकाणी घेतली आहे. नाशिकचा आज स्मार्टसिटीमध्ये समावेश झाला आहे. पहिल्या दहा शहरांत नाशिकचे नाव आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नोकरभरतीवर बोलतांना ते म्हणाले तांत्रिक पदांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत.