ऐन उन्हाळ्यात नांदेड मनपाची जलतरणिका बंद
नांदेड, दि. 08 - महापालिकेची कै. शांताराम सगणे जलतरणिका गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईमुळे नव्हे तर मनपाच्या गलथान कारभारामुळे दुरूस्तीसाठी बंद आहे.
मराठवाड्यात नांदेडचे तापमान सर्वाधिक आहे. अशा काळात जलाशयात पोहण्याचा लाभ मिळावा म्हणून सर्वजण धडपडत असतात. विष्णुपूरी जलाशय शहरालगत आहे पण या जलाशयात पाणी नसल्याने नागरिकांना तेथे जाता येत नाही. महापालिकेकडून स्टेडीयम परिसरात जलतरणिका बांधण्यात आली. पण ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत तेथेही दुरुस्तीचे काम काढल्यामुळे जाता येत नाही. किरकोळ कामासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ही जलतरणिका बंद ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे नांदेड शहरात नांदेड क्लब येथे देखील अद्यावत अशी जलतरणिका निर्माण करण्यात आली पण याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नसल्याने अनेकांना या जलतरणिकेचा लाभ घेता येत नाही. सध्या महापालिकेची जलतरणिका दुरूस्त होईपर्यंत नांदेड क्लबची जलतरणिका नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी होत आहे.