Breaking News

तलावातील विहिरीत बुडून आई व मुलीचा मृत्यू ; एक मुलगा-मुलगी वाचवण्यात यश

अहमदनगर, दि. 21 - कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथिल तळयातील विहीरीत बुडून आई व मुलीचा मृत्यु तर एक मुलगा व एक मुलगी वाचवण्यात शेेतकर्‍यास यश. पोलिस सुत्राकडुन मिळालेल्या माहीतीनुसार कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री कवडे व मांढरे वस्ती येथिल शेेतकरी अनिल दत्तात्रय थोरात वय 40 हा आपल्या कुटुंबासोबत येथे राहात असुन गुरूवार दि.20 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अनिलची पत्नी मिरा अनिल थोरात वय 35 ही आपल्या तिन मुलांसह स्विटी अनिल थोरात वय 16 ही इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत आहे, दुसरी मुलगी ज्ञानेश्‍वरी अनिल थोरात वय 13 ही इयत्ता 7 वी मध्ये षिकत होती, मुलगा ओम अनिल थोरात वय 12 हा इयत्ता पाचवीत शिकत आहे. मिरा आई सोबत कवडे व मांढरे वस्ती जवळील तळ्यावर कपडे व गाई - म्हशी धुण्यासाठी गेले आसता तळ्यातील पाण्यात आसणार्‍या बाभळीच्या झाडाला गाई बांधुन धुत आसतांना पाण्यातच उभी आसणार्‍या ज्ञानेश्‍वरीचा पाय घसरला आसता मुलगी पाठीमागे आसणारा तिन चार परसाचा खड्यात पडली मुलगी गटगळया खात आसल्याचे पाहुन आई मिरा तिला वाचवण्यासाठी पुढे गेली परंतु आईला ही समोरील पाण्याचा अंदाज समजला नाही त्यामुळे तीही गटगळया खावु लागल्याचे मुलगा ओम याला दिसल.े आसता ताही पाण्यात उतरून आई व बहीनीला वाचण्यासाठी गेला परंतु 12 वर्षाचा ओम त्या पोहण्याचा किती अनुभव असणार तो देखील बुडु लागला त्यावेळी तो मोठयाने ओरडत होता. त्याच्या आवाजाने त्याची मोठी बहीन स्विटी ही पाण्यात उतरून मोठयाने ओरडली असता त्यांचा ओरडण्याचा आवाज हकेच्या अंतरावर शेतात बारे मोडत असणारा शेतकरी रामभाऊ कवडे हे धावत घटना स्थळाकडे आले आसता ओम पाण्यात बुडत आसल्याचे पहुन त्याला वाचवण्यासाठी रामभाऊ यांनी पाण्यात उडी घेवुन ओमचे प्राण वाचवले व पाण्यातच उभी आसलेल्या स्विटीला ही बाहेर काढण्यात यश मिळाले परंतु खोल पाण्यात बुडालेल्या माय लेकी काढण्यास वेळ लागला ज्या खोल पाण्यात या दोघी आहेत त्या पाण्याचा आंदाज लागत नव्हता गढुळ पाणी व खाली गाळ आसल्याने पाण्यात बुडया मारणार्‍या लोकांना मिरा व ज्ञानेश्‍वरी सापडत नव्हत्या शेवटी एक पर्याय म्हणुन बोरीच्या झाडाच्या फांदा पाण्यात सोडुन दोघींचा शोध घेण्यास सुरूवात केली आसता सुरूवातीला बोरीच्या फादींला मुलांची आई मिरा लागली. त्यानंतर आर्धा तासांनी ज्ञानेश्‍वरीचा ही तसाच शोध घेत तिलाही बाहेर काढले परंतु आई मिरा व ज्ञानेश्‍वरी हया मृत आवस्थेत मिळाल्या हा माय लेकीला बाहेर काढण्यासाठी जवळ जवळ दिड तास हा सर्व प्रयत्न करत होते. या कामी शरद गंगावणे, विलास गंगावणे, सोन्याबापु गंगावणे, सोमनाथ मांढरे, यांनी प्रयत्न केला.
या घटनेची माहीती मिळताच मिरजगांव दुरक्षेत्राचे पि.एस.आय प्रमोद भिगारे,पो.कॉ साबळे,पो.कॉ.हदय घोडके, इ.पि.आय इडिकर, तसेच गुरवपिंप्रीचे प्रभारी कामगार तलाठी विश्‍वजित चौघुले घटना स्थळी पोहचुन परीस्थितीचा आढावा घेत  आई मिरा थोरात व मुलगी ज्ञानेश्‍वरी यांना उत्तरीय तपासनीसाठी कर्जत येथील उप जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आल. या घटने बाबतची तक्रार अनिल थोरातचे चुलते राजेद्र थोरात यांनी कर्जत पोलीस स्टेषन येथे नोंदवली असुन पुढील तपास कर्जतचे उपअधिक्षक सुदर्षन मुंढे यांच्या मार्गदर्षनाखाली पी.एस.आय.प्रमोद भिगारे करत आहेत.