आनंदधाम परिसरात आनंद बाल संस्कार शिबीराचे
भव्य-दिव्य स्वरुपात आयोजन ; 600 मुलांचा सहभाग
अहमदनगर, दि. 21 - सुर्याच्या कोवळ्या किरणांनी सुरु झालेली रम्य सकाळ, घड्याळाचे काटे सातच्या दिशेने पळताहेत. तशी तशी या आनंदधाम परिसारातील किलबिल वाढू लागते. पक्षांचा मोठा थवा अकाशात उडावा. तशी आमची ही चिमणी पाखर धावत पळत आनंदधाम गाठतात व सकाळी 7 वाजता प्रार्थनेला सुरवात होते. एकीकडे प्रार्थना सुरु असते तर दुसरी कडे मुलांची जागेवर बसण्याची लगबग खुपच सुंदर असे दृश्य होते आनंदधाम येथील आनंद बाल संस्कार शिबीरात.आचार्यश्रीजींचा हा ज्ञानाचा व संस्काराचा वारसा घेऊन दरवर्षी ‘आनंदधाम’ येथे प्रबुद्ध विचारक पू.श्री. आदर्शऋषीजींच्या मार्गदर्शनाखाली सर्व साधू-साध्वीवृंदांच्या सानिध्यात जैन सोशल फेडरेशन व धार्मिक परिक्षा बोर्डतर्फे ‘आनंद बाल संस्कार शिबीरा’चे आयोजन केले आहे.
आनंदधाम मुलांच्या फुलांनी सजलेले एक सुंदर उद्यानच बनले ! 600 मुलांना 25 वेगवेगळ्या कक्षांत ज्ञानदानाचे अद्भूत कार्य करणारे महासतिजी व शिक्षक यांच्या सुंदर संयोजनात हे ‘संस्कार यज्ञ’ फारच यशस्वीतेने पार पडत आहे. बरोबर 7 वा. पुज्य विपुलदर्शनाजी म.सा. यांच्या नवकार महामंत्राच्या मंगलाचरणाने पहिले सत्र योगाभ्यासाने सुरु होईल. दररोज वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम घेऊन शरीरास लवचिकता आणली व रोज वाढत्या संख्येने सूर्यनमस्कार करुन घेतले. अॅरोबिक्सचा वर्ग जागतिक प्रशिक्षिक प्रणव गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली होत. शारीरिक आरोग्य नेहमी मानसिक जडण-घडणास पुरक ठरते. या विचारांचा मागोवा घेत घेत हा अर्धा तास शिबीरार्थींना प्रसन्न करीत असे. संगीत व त्याच्या बरोबर व्यायाम यामुळे मुले उत्साहाने एरोबिक्स व्यायाम करीत आहे. जेणे करुन मुलं आपली आत्मिक शक्ती वाढवतील व त्यांच्या विचारात आणि जीवनात स्थिरता येईल. नंतर 7.30 ते 9 या वेळेत विविध वक्ते वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करत आहेत.