हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच; कोकणातून आंब्याची आवक वाढली
पुणे, दि. 18 - पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणच्या बाजारात देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मात्र या आंब्यांचे दर हे सर्वसामान्यांना अजूनही न परवडणारेच आहेत. रत्नागिरी हापूसचा दर 400 ते 800 रुपये प्रति डझन आहे, तर देवगडचा दर हा 500 ते 1200 रुपये डझन आहे. कोकणातून आंब्यांची आवक वाढली असली तर दर अजूनही परवडत नसल्याने सर्वसामान्य ग्राहक अजूनही आंबा खरेदीपासून दूरच आहे.
सध्या आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. उद्योगनगरीतील विविध ठिकाणच्या फळ मार्केटमध्ये आंबा दाखल झाला आहे. कोकणातील आंब्याची आवक वगळता इतर प्रदेशातील आंब्यांची अपेक्षित आवक अजून झालेली नाही. कोकणातील आंब्यांची आवक वाढली तरी आंब्यांचे भाव मात्र तेजीत आहेत. दरवर्षी अक्षय तृतीयेपासून आंब्यांना मागणी वाढते. पावसाळ्यापर्यंत आंब्यांचा हंगाम राहत असल्याने यावर्षी फार थोड्या काळासाठी आंब्याची उलाढाल राहण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणच्या फळ मार्केटमध्ये देशाच्या कानाकोपर्यातून आंबे येतात. त्यात कोकणातील हापूसला व्यापारी आणि ग्राहकांची पसंती असल्याने कोकणचा आंबा नेहमीच नंबर बन असतो. रत्नागिरी हापूस व देवगड आंब्याबरोबरच पुढील आठवड्यात कर्नाटक व मद्रास आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होणार असल्याचे फळ व्यापार्यांनी सांगितले.
कोकणातील हापूसची एक वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरी व देवगडच्या हापूस आंब्याला बाजारात प्रचंड मागणी असते. मात्र त्याचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याचा फायदा घेत पिंपरी-चिंचवडमधील काही व्यापारी देवगड व रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या पेटील इतर आंबे घालून ते रत्नागिरी व देवगडचा आंबा म्हणून ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होत आहे. त्यापासून ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे.