Breaking News

माऊली जमदाडे यांनी भोसरेचे कुस्ती मैदान मारले

भोसरे, दि. 18 (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यातील भोसरे येथील श्री हनुमान यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात पै. माऊली जमदाडे व पै. मारुती जाधव यांच्यात कुस्ती रंगली दोघांनी एकमेकाचा अंदाज घेत डाव प्रतिडाव करत दोघे सावध पवित्रात खेळात होती. त्यातच पै. माऊली जमदाडे यांनी एक बार टांग लावण्यासाठी प्रयत्न केला. तो पै. मारुती जाधव यांनी धडकावून लावला. पै. माऊली जमदाडे आक्रमक पवित्र्यात खेळत होत. त्याच त्याने पोकळ घिस्सा डावावर पै. मारुती जाधव यास चितपट केले.
या कुस्ती मैदानाला जिल्ह्याच्या विविध भागातून मल्ल उपस्थित राहिले होते. पहिल्या क्रमांकाची कुस्ती निकाली निघाल्याने जनसमुहिचे डोळ्याचे पारणे फिटले. तसेच 1 लाख 51 हजार रूपयेची कुस्ती पै. माऊलीने मारली तसेच दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती पै. योगेश बोंबाळे व पै. भारत मदने यांच्यात होती. पंरतु पै. भारत मदने यांच्या घरात आचानक अडचण आल्याने तो उपस्थित राहू शकला नाही. तेव्हा पै. योगेश बोंबाळे संपूर्ण फडात एक फेरी काढून जोडच लागली नाही. पै. योगेश बोंबाळे यास विजय घोषणा केली. उपस्थित त्यामुळे नाराज झाले. कुस्ती क्रमांक तीनचा प्रशांत शिंदे विरुध्द भारत लोकरे यांच्यात झाली. एकमेकांचा ताकदीचा अंदाज घेत दोघेही सावध पवित्रा घेत डाव प्रतिडाव करत एकमेकांवर अक्रमण करत अखेर प्रशांत शिंदे यांनी त्याच्यावर कब्जा मिळवला व प्रशांत यांनी भारतचा पट काढत उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच कुस्ती क्रमांक चार महादेव माने व सरदार सावंत यांच्यात होती, परंतु या कुस्तीत पैलवान जखमी झाल्यानंतर कुस्ती बरोबरीत सोडली. या मैदानात 100 रूपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या झाल्या. त्यातील नामांकित कुस्त्या सागर पवार, रूपेश साठे, अमर मदने, निखिल जाधव, अनिकेत पवार, गणेश जाधव, संकेत चव्हाण, यांच्या कुस्त्या झाल्या. या कुस्ती मैदानास अन्य मान्यवर उपस्थित होते. कोकण विभाग आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार गजानन बाबर, उपमहाराष्ट्र केसरी साहेबराव जाधव, सुरेश वाटकार, संदीप बाबर, माजी पी आय शिवजीराव देशमुख, भुईंज कारखाना संचालक मधुकर शिंदे, नाथा धोत्रे, प्रा. दिलीप पवार, बाळासाहेब दरेकर, उत्तमराव लावंड, ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी मांडवे, सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सर्वगोड, माजी जिल्हा परिषद बंडा गोडसे, देवकरशेठ कुमठे, देवस्थानचे उपाध्यक्ष विष्णूशेठ जाधव, जयंत कुलकर्णी, पी. आय बाळासाहेब देशमुख, तहसीलदार विश्‍वास गुजर, शंकर वलेकर, मानजी घाडगे, विजय देवकर, विजय काळे, अजुर काळे उपस्थित होते.