कोथरूडमध्ये क्रिकेटच्या वादातून तरुणावर जिवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
पुणे, दि. 05 - क्रिकेट खेळताना झालेल्या क्षुल्लक वादातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयता आणि लोखंडी हत्यारांच्या सहाय्याने जिवघेणा हल्ला केला. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवार (2 एप्रिल) रोजी रात्री डावी भुसारी कॉलनी, कोथरूडमध्ये घडली.
याप्रकरणी अक्षय सदाशिव काळोखे (वय-21, रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरूड, पुणे) याने फिर्याद दिली असून अभिजीत ताकवले याच्यासह आठ ते नऊ जणांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या मंडळातील शुभम हुले आणि सुमित उभे यांची आरोपीसोबत क्रिकेट खेळण्यावरून भांडण झाले होते. यावेळी फिर्यादी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना तुमचे मंडळ येथे राहतेच कसे अशी धमकी दिली आणि निघून गेला.
दरम्यान रात्री नऊ वाजता फिर्यादी मित्रांसोबत गप्पा मारत उभे असताना दुचाकीवरून आलेल्या आठ ते नऊ इसमांनी फिर्यादीवर कोयता आणि लोखंडी हत्यारांनी जिवघेणा हल्ला केला.त्यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक एम.एस.बनसोडे अधिक तपास करीत आहेत.