Breaking News

पाण्याच्या गैरवापर करणार्‍यांवर कारवाईचा इशारा

पुणे, दि. 05 - तापमानातील वाढ लक्षात घेता धरणसाठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात पाणीसंकट निर्माण होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाण्याचा गैरवापर करणा-यांवर पुढील आठवड्यापासून कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी व्हि.जी.कुलकर्णी यांनी दिली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरणात मिळून 11.25 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहर आणि हद्दीतील ग्रामीण भागांचा विचार करता हा पाणीसाठा पुढील चार महिने पुरेसा आहे. त्यादृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.