Breaking News

पवननगरमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सव साजरा

अहमदनगर, दि. 06 - पवननगर, भिस्तबाग येथील श्रीराम हनुमान मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी 6 वाजता यजमान शांतीलालजी मुनोत यांच्याहस्ते श्रींचा महाभिषेक करण्यात आला. 
सकाळी 10 वाजता संगित विशारद, किशोर माळवदे, राजेंद्र उल्हारे यांनी ‘ राम रंगी रंगु या’ हा भक्ती जन्मोत्सव कार्यक्रम सादर केला. त्यांना तबल्यावर रोहित गडकर व मृदंगावर प्रकाश थिटे व श्रीराम सेवा भजनी मंडळाने संगित साथ केली. तसेच श्री महालक्ष्मी, सितामाई पंढरी, स्वरदायिनी, विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाने भजने सादर केली.
दुपारी 12 वाजता प्रभु श्रीराम जन्म सोहळ्यास प्रारंभ झाला यावेळी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवून महिलांनी टिपरी नृत्य, पाळणा, अंभग, औक्षण व आरती केली. यावेळी श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमानाची वेषभूषा केलेले बालकलावंतानी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमास आ. संग्राम जगताप, नगरसेवक संपत बारस्कार, नगरसेविका शारदाताई ढवण, अभिजित खोसे, सारंग पंधाडे, योगेश ठुबे, उषाताई नलावडे, नानासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.  श्रीराम हनुमान मंदिरा समोरील खुली जागा विकसीत करण्यासाठी आपण निधी देऊ अशी घोषणा योवळी आ.जगताप यांनी केली. रामजन्मोत्सव सोहळ्यासाठी सहकार्य करणार्या डॉ.संदिप कडू, डॉ.सतिश फाटके, रामदास उदमले, शरद बोरुडे, दिलिप कुलकर्णी, संपतराव नलवडे, आनंद भंडारी, संदिप कसबे, आदींच्या यावेळी सत्कार करण्यात आला.