मुदत संपलेल्या ठेवीचे पैसे मिळण्याची मागणी
अहमदनगर, दि. 06 - सावेडी येथील महालक्ष्मी मल्टीस्टेट को.ऑप बँकेकडून आर्थिक फसवणुक झाल्याने ठेवीदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण केले. यामध्ये मधुकर वाणी, विजय कदम, अशोक कदम आदिंसह ठेवीदार सहभागी झाले होते.
सदर बँकेत ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या. ठेवीची मुदत संपली तरी पैश्याची मागणी केली असता, बँकेकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. अनेकवेळा विनंती, अर्ज करुन देखील ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांनी उपोषण सुरु केले आहे. बँकेच्या चेअरमन सौ.हेमा सुपेकर यांनी ठेवीदारांची आर्थिक फसवणुक केली असून, त्यांच्यावर कारवाई करावी.
तसेच ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे परत मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.