Breaking News

कोलकात्याचा पुण्यावर दमदार विजय

पुणे, दि. 27 - आयपीएलच्या दहाव्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने रायजिंग पुणे सुपरजायंटवर जबरदस्त विजय मिळवला.  पुण्याने विजयासाठी ठेवलेले 183 धावांचे आव्हान कोलकात्याने 7 विकेट राखून पूर्ण केले आणि मोसमातील सहाव्या विजयाची नोंद केली. या विजयासह कोलकात्याने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले.
कोलकात्याकडून रॉबिन उथप्पाने 47 चेंडूत 87 धावा कुटल्या. तर दुसरीकडे कर्णधार गौतम गंभीरने त्याला जबरदस्त साथ दिली. त्याने 46 चेंडूत 62 धावांची तडाखेबंद खेळी केली.