Breaking News

ट्रिपल तलाकवर आगपाखड करणार्‍या महिलेचा माफीनामा

नवी दिल्ली, दि. 23 - ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर धर्म आणि समाजाच्या ठेकेदारांना खडे बोल सुनावणार्‍या मुस्लिम महिलेने अखेर याच समाजापुढे नमतं घेतलं आहे. दबावानंतर तिने माफीनामा मागितला आहे. मुस्लिम धर्मातल्या ट्रिपल तलाक पद्दतीनं महिलांची कशी वाताहत होते, कसं निर्दयपणे पुरुष महिलेला त्याच्या आयुष्यातून हद्दपार करतो, हे सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र यानंतर आलेल्या दबावामुळे संबंधित महिलेनं आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे.
काहीच दिवसांपूर्वी संबंधित महिलेच्या बहिणीला पतीने तोंडी तलाक दिला गेला होता. त्या रागातून आपण ट्रिपल तलाक पद्धतीबाबत उद्विग्न झाल्याचं तिनं म्हटलं आहे. महिलेने योगी सरकारच्या आदर्श धोरणांचं कौतुक केलं होतं. ट्रिपल तलाक, कत्तलखाना यासारख्या मुद्द्यांचा यात समावेश होता. संबंधित महिलेच्या बहिणीने स्थानिक कोतवालांकडे यासंबंधी लेखी तक्रार केली होती. सासरच्या मंडळींनी तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणला होता. अखेर तोंडी तलाक देऊन 16 एप्रिलला त्याने दुसरं लग्न केलं. कदाचित तिच्या माफीनं तिला विरोध करणार्‍यांचं समाधान झालंही असेल. मात्र तीन वेळेस एक शब्द उच्चारुन देवाच्याच साक्षीनं स्वीकारलेलं नातं कसं संपुष्टात येतं, हा सवाल उपस्थित होत आहे.