धुळ्यात उष्माघाताचा दुसरा बळी
धुळे, दि. 27 - धुळे जिल्ह्यात उष्माघातानं दुसरा बळी घेतला. धनुरमधील शेतकरी अशोक पितांबर पाटील यांचा उष्माघाताने उपचारादम्यान मृत्यु झाला. पाटील हे शेतात काम करत असतांना त्याना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि ते भोवळ येऊन शेतातच पडले. त्यांचा मुलगा संदेशच्या हे लक्षात येताच त्यानं वडीलांना प्रथोमचारासाठी कापडणेच्या आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र, प्रकृती खालावल्यानं पाटील यांना धुळ्यातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. मात्र दुर्दवानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.