काँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त - साध्वी प्रज्ञा
भोपाळ, दि. 27 - काँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त झाले, नऊ वर्ष मी अन्याय सहन केलाय. मुंबई एटीएसकडून माझा छळ करण्यात आला आहे, असा थेट आरोप 8 वर्षानंतर जेल बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केला.
साध्वी मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. कोर्टाचा जामीन मिळाल्यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका केली. नऊ वर्ष काँग्रेस सरकारमुळे आपण तुरुंगात खितपत पडलो. कोर्टाच्या जामीनानंतर आता आपण अर्धमुक्त झालो आहोत. आपली लढाई सुरुच राहणार आहे, अस सांगत प्रज्ञा सिंह यांनी आपली बाजू मांडली. तर त्याचवेळी भगव्या दहशतवादाला घाबरच पाहिजे अस थेट सांगत आपल्या कडव्या हिंदुत्ववादाचाही पुनरुच्चार केला.