Breaking News

सिंगापूर सीरीजवर भारताचं वर्चस्व, साई प्रणितला विजेतेपद

सिंगापूर, दि. 16 - भारताच्या बॅडमिंटनवीरांनी सिंगापूर सीरीजवर निर्विवाद वर्चस्व राखलं. भारतीय बॅडमिंटनपटू साई प्रणितला विजेतेपद, तर किदम्बी श्रीकांतला उपविजेतेपद मिळालं. भारताच्या बी. साई प्रणितनं भारताच्याच किदम्बी श्रीकांतचं कडवं आव्हान 17-21, 21-17, 21-12 असं मोडीत काढून सिंगापूर सुपर सीरीजच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
साई प्रणित आणि श्रीकांतमधली विजेतेपदासाठीची ही लढत तब्बल 54 मिनिटं रंगली. भारतीय बॅडमिंटनवीरांनी या स्पर्धेवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. सुपर सीरीजच्या इतिहासात दोन भारतीय बॅडमिंटनपटूंच फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी चीन, इंडोनेशिया आणि डेन्मार्क या देशांचेच बॅडमिंटनवीर फायनलमध्ये खेळल्याची उदाहरणं आहेत. बॅडमिंटनमधल्या त्या तीन महासत्तांच्या पंक्तीत आता भारत दाखल झाला आहे.