उरमोडी नदीच्या पात्रातील खड्ड्यात बुडून मुलीचा मृत्यू
शेंद्रे, दि. 6 (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील वेचले येथील कु. श्रावणी विठ्ठल कुंभार (वय 12) हिचा उरमोडी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात पडलेल्या खड्ड्यांमुळे श्रावणीचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरम्यान, वाळू ठेकेदारावर गुन्हे दाखल केला जात नाही, तोपर्यंत श्रावणीचा मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला होता. मात्र, बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनिमयूर वैरागकर यांच्या आश्वासनानंतर श्रावणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
वेचले येथील श्रावणी विठ्ठल कुंभार (वय 12) मंगळवारी सुमारास आईसोबत कपडे धुण्यासाठी उरमोडी नदीकाठी गेली होती. आई कपडे धुत असताना श्रावणी नदीपात्रात खेळत होती. त्यावेळी तिचा पाय घसरून ती वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्यातील पाण्याच्या प्रवाहाने खेचली गेली. तिला पोहता येत होते. मात्र, खड्ड्यामधील भोवर्यात सापडल्याने ती पाण्यात बुडाली. काठावरील लोकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रावणी 20 ते 25 फूट खोल पाण्यात बुडाली. बेसुमार वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात बुडून मुलीचा मृत्यू झाल्याचे कळताच शेंद्रे व वेचले येथील ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर गावकर्यांनी श्रावणीचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेची माहिती समजताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि मयूर वैरागकर व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेसुमार वाळू उपसा करून नदीपात्रात मोठे खड्डे करणार्या वाळू माफियांविरोधात पोलीस गुन्हे दाखल करत नाहीत आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत श्रावणीचा मृतदेह तेथून हलवणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. वैरागकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने पेच निर्माण झाला. अखेर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन वैरागकर यांनी दिले. त्यानंतर सायंकाळी उशिरा ग्रामस्थांनी श्रावणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यास संमती दिली. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून सपोनि. वैरागकर अधिक तपास करत आहेत.