एलआयसीतर्फे दोन नव्या विमा योजना महिलांसाठी आधार शीला; पुरुषांसाठी आधार स्तंभ
सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : भारतीय जीवन बीमा निगमने महिलांसाठी आधार शीला तर पुरुषांसाठी आधार स्तंभ या दोन नव्या विमा योजना सुरु केल्या आहे. दोन्ही विमा योजनामध्ये सहभागी होणार्या विमेदारास आधारकार्ड असल्याच त्याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती वरिष्ठ मंडल प्रबंधक तुलसीदास गडपायले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस एलआयसीचे विपणन प्रबंधक उत्पल तरफदार, ग्राहक संबंध प्रबंधक पांडुरंग टोपले, विक्रय प्रबंधक पवनकुमार बर्नवाल उपस्थित होते.
गडपायले म्हणाले, या दोन्ही योजनांसाठी विमेदाराचे किमान वय 8 वर्ष पूर्ण तर कमाल वय 55 वर्ष असणे आवश्यक आहे. या पॉलीसीची मुदत 10 वर्षे, 15 वर्षे व 20 वर्षे अशी आहे. किमान विमा रक्कम 75 हजार ते कमाल विमा रक्कम 3 लाख रुपये आहे. वार्षिक, सहामाही आणि त्रैमासिक व मासिक हप्ते भरण्याची सोय आहे. दोन्ही विमा योजनांसाठी आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. गेल्या आर्थिक वर्षात साताराचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या सहकार्याने सातारा-सांगली जिल्ह्यातील 213 गावे विमाग्राम करण्यात एलआसीला यश आले आहे. त्यासाठी 1 कोटी 40 लाख रुपये या गावांना मदत दिली आहे. त्यापैकी 45 गावांना 1 लाखापेक्षा जास्त मदत दिली आहे. यंदाच्या वर्षी 1 हजार गावे विमा ग्राम घोषित करण्याचा आमचा मनोदय असल्याचे गडपायले यांनी सांगितले.