पंधरा लाख रुपयांच्या रोकडसह दोघांना अटक
पुणे, दि. 02 - चलनातून रद्द झालेल्या एक हजारांच्या नोटा बदली करण्यासाठी आलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतून त्यांच्याकडून तब्बल पंधरा लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान 31 मार्च हा रिझर्व्ह बँकेतून नोटा बदलून घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे दोघे पंचवीस टक्के कमिशनवर नोटा बदलून घेण्यासाठी शहरात आल्याची माहिती तपासात समोर आली. गणेश रामचंद्र मोरे (वय 27, रा. शिळाटणे पोस्ट कार्ला ता. मावळ जि. पुणे) आणि संतोष आबू मराठे (वय 34, रा. मु. डोंगरगा ता. लोणावळा जि. पुणे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कात्रज परिसरातील वंडरसिटी शेजार असलेल्या अन्नपुर्णा हॉटेल समोर दोन व्यक्ती उभे असून ते जून्या 1 हजाराच्या नोटा बदलण्यासाठी आले असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलिस नाईक श्रीधर पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर हॉटेल अन्नपुर्णा समोर सापळा रचून गणेश मोरे आणि संतोष मराठे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतल्यावर मोरे याच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चलनातून बाद झालेल्या एक हजारांच्या एकूण 1 हजार 500 नोटा मिळून आल्या. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. तसेच याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, ही रक्कम मागील वर्षी केलेल्या जमीन विक्रीतून आलेली आहे. ती वडिलांच्या नकळत घरात लपवून ठेवली होती. एकजण पुण्यामध्ये ही रक्कम 25टक्के कमिशनवर बंदलून देणार होता असे त्यांनी सांगितले. ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, श्रीधर पाटील, गणेश सुतार, समीर बागसिराज, बाबासाहेब नरळे यांच्या पथकाने केली.