इन्फोसिसमधील अभियंता रसिला राजूच्या मारेक-याचा जामिनासाठी अर्ज
पुणे, दि. 02 - इन्फोसिसमध्ये अभियंता तरूणीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी सुरक्षा रक्षक भाबेन भराली सैकीया (वय 27, रा. हिंजवडी, मूळ. आसाम) याने जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर 10 एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने सरकारी पक्षाला दिला आहे. विशेष न्यायाधीश एल.एल.येनकर यांनी हा आदेश दिला आहे.बचाव पक्षातर्फे ड. बी.ए. आलुर,. तौसि
फ शेख आणि ड. साजेद शहा यांनी हा अर्ज दाखल केला आहे. रसिला राजू ओ.पी. (वय 24, रा. हिंजवडी, मूळ. केरळ) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. ही घटना 29 जानेवारी रोजी घडली होती. सुरक्षा रक्षक असलेल्या सैकीया याने रसिला हिच्याकडे रोखून पाहिले. त्यामुळे रसिला राजू हिने सैकीया याला रोखून का पाहतो, रोखून पाहिल्याने मी तुझी तक्रार वरिष्ठ अधिकार्यांकडे करणार आहे, असे म्हटले. त्याचा राग मनात धरून सैकीया याने रसिला यांचा केबलने गळा आवळून खून केला होता. या प्रकरणी बचाव पक्षातर्फे न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर सुनावणी करत न्यायालयाने सरकारी पक्षाला 10 एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे.