मतदारसंघातील विकास हेच ध्येय : आमदार धोंडे
बीड, दि. 18 - आष्टी मतदारसंघातील विकास कामे करणे हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार भिमराव धोंडे यांनी केले. ते वैद्यकिन्ही येथील विकास कामांच्या भुमिपुजन कार्यक्रमात बोलत होते.
पाटोदा तालुक्यातील डोमरी, वैद्यकीन्ही, पांचग्री हा रस्ता अतिक्षय खराब झाला होता या रस्त्यासाठी आ.भिमराव धोंडे यांच्या प्रयत्नातुन निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी 7 वाजता आ.धोंडे यांच्या उपस्थितीत व सभापती पुष्पाताई सोनवणो यांच्या अध्यक्षते खाली वैद्यकीन्ही येथे पार पडले. या वेळी आमदार धोंडे बोलताना म्हणाले की, मला पैसे कमावण्याची गरज नाही.माझ्याकडे जे आहे त्यात मी सुखी आहे. मी पंधरा वर्षे आमदार होतो. सत्तेत होतो. पण कधी पैशाचे, भष्टाचाराचे शिंतोडे स्व:तवर येऊ दिले नाहीत. पैसे कमावणो हे माझे ध्येय नाही. मी आता फक्त आणि फक्त विकासच करणार आहे. आपला सगळ्यांचा एक ध्यास आपण सगळे मिळून करुया विकास असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठवर जिल्हा परिषद सदस्य नवले, पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई सोनवणो, उप सभापती संगिताताई मिसाळ, प. स. सदस्य महेंद्र नागरगोजे, देविदास शेंडगे, लांबरुड, भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर घुमरे, मधुकर गज्रे, पांडुरंग नागरगोजे, अनिल जायभाये, सत्यसेन मिसाळ, गावचे सरपंच, पाटोदा नगरपंचायतच्या नगरसेवक, पत्रकार लांडगे, तालुक्यातील भाजपाचे नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.