ईसारवाडीतून देशी दारू जप्त
औरंगाबाद, दि. 18 - दारूबंदी समितीच्या संतप्त महिला पदाधिकार्यांनी पैठण एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने ईसरवाडी(ता.पैठण) येथे 9 हजारांची देशी दारु पकडून दिली. या प्रकरणी दोघांना विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 एप्रिल रोजी ईसरवाडी येथील दारूबंदी समितीच्या अनिता भवर,छाया शेळके यांच्यासह 15 ते 20 महिलांनी पोलिसांना ईसरवाडी येथे अवैध दारु विक्री सुरू असल्याची माहिती दिली. यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर पायघन आपल्या सहकार्यांना व तक्रारकर्त्या महिलांना सोबत घेऊन दोन ठिकाणी छापे टाकले. यात दिलीप मुरलीधर खोडे याच्या घरून देशी दारुच्या 155 बाटल्या तसेच नामदेव पंढरीनाथ बर्डे याच्या घरातून दहा बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारुची एकुण किंमत 8300 रूपये होते.