Breaking News

किनगावात प्राणीमित्राने वाचविले कासवाचे प्राण!

लातूर, दि. 18 - जवळील कोपरा तलावाच्या जवळून जाणार्या राज्यमार्गावर एक भारतीय कासव एका वाहनाखाली चिरडताना थोडक्यात बचावले. किनगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संजय वाहुळे यांनी कासवाची केविलवाणी अवस्था पाहून त्याला अलगद उचलून घेतले. प्राणीमित्र असलेले धनंजय गुट्टे व अभिमन्यू मुंढे यांनी कोपरा तलावात सोडून त्याला जीवदान दिले.
किनगाव येथील पोलीस आणि पक्षी व प्राणीमित्र असलेले धनंजय गुट्टे व अभिमन्यू मुंढे यांनी आतापर्यंत शेकडो सापांना, पक्षी, रंग बदलणारा सरडा, घोरपड व इतर प्राण्यांना जीवदान दिले. या भागात कोठेही साप दिसताच धनंजय गुट्टे यांना बोलावले जाते. गुरुवारी सकाळी कोपरा तलावाच्या जवळून जाणार्या अंबाजोगाई -अहमदपूर राज्यमार्गावर एक कासव एका वाहनाखाली चिरडताना थोडक्यात बचावले. किनगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संजय वाहुळे यांनी कासवाची केविलवाणी अवस्था पाहून त्याला अलगद उचलून घेतले. प्राणीमित्र असलेले धनंजय गुट्टे व अभिमन्यू मुंढे यांना बोलवून घेतले. त्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडणो आवश्यक असल्याने त्या कासवास सुरक्षित ठिकाणी मोठया तलावात सोडून त्याला जीवदान दिले. सध्या अंधश्रद्धेपोटी कासवांची तस्करी होताना दिसून येते, परंतु निसर्गाच्या या सुंदर ठेव्यांना जपण्याची कायदेशीर जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची आहे. त्यासाठी प्रत्येकाने वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण करावे, असे आवाहन धनंजय गुट्टे यांनी केले आहे.