फाजील आत्मविश्वासाने केला आत्मबळाचा घात
भुजबळ कुठल्या गुन्ह्याची सजा भोगत आहेत...
आंधळेपणाने ठेवलेला विश्वास आयुष्याची कारकिर्द किती गंभीर वळणावर घेऊन जातो हे समजून घ्यायचे असेल तर छगन भुजबळ यांचा दोन वर्षाचा प्रवास पुरेसा आहे.अंधविश्वासातून निर्माण झालेला आत्मविश्वास कठीण काळात उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही.किंबहूना हा आत्मविश्वास मुळ आत्मविश्वासाला फाजीलतेकडे घेऊन जातो,आणि मग आणिबाणीच्या काळात उसन्या आत्मबळाने कितीही जोर लावला तरी अपयशाच्या दरीतून बाहेर पडता येत नाही.छगन भुजबळ यांचा प्रवास याच वाटेवर मार्गस्थ असल्याचे एसीबी आणि साबां क्लीन चीट अहवालाचा पिंड सांगतो आहे.छगन भुजबळ यांच्या सुटकेचे दरवाजे उघडले जाणार असे दिसताच नवे प्रकरण समोर उभे असते किंवा मुद्दामहून उकरून काढले जाते.दि. 03, एप्रिल - छगन भुजबळ महाराष्ट्राचा ढाण्या वाघ.....ग्रामिण आणि शहरी भागाला जोडणारा चिकित्सक आणि तितकाच मुत्सुद्दी दुवा.आयुष्याचे शहाणपण मुंबईसारख्या शहरात त्यातही मातोश्रीच्यासहवासात आत्मसात केले असले तरी त्यांची खरी नाळ ग्रामिण भागाशीच जोडली गेली असल्याने दोन्ही भागांत समतोल राखण्याचे कसब साधतांना भुजबळांना कसरत करावी लागली नाही हा त्यांच्या राजकीय आणि सामाजिक यशस्वी वाटचालीतील महत्वाचा धागा आहे.याच धाग्याच्या मदतीने भुजबळ आपली राजकीय वीण घट्ट विणण्यात ते यशस्वी झाले.
भुजबळ यांच्या पिढीत महाराष्ट्रात जेव्हढे राजकीय धुरंधर आहेत,त्यात सर्वार्थाने यशस्वी ठरलेले राजकीय नेतृत्व म्हणजे छगन भुजबळ आणि फक्त छगन भुजबळ एकमेव आहेत.महाराष्ट्रातच नव्हे देश पातळीवर ओबीसी समाजाचा सर्वमान्य नेता म्हणून ते लोकप्रिय ठरले.देशभरात विखुरलेल्या भटक्या विमुक्त,दीन उपेक्षित,ओबीसी प्रवर्गातील विविध पोटजातींना पिवळ्या झेंड्याखाली एकञ आणणारा नेता म्हणून भुजबळ यांची ओळख अलिकडच्या काही वर्षात झाली होती.
छगन भुजबळ यांचा हा नवा पैलू देशाच्या नजरेत भरला .त्यांची नृव्याने होऊ लागलेली ओळखच त्यांना आर्थर रोडच्या आवारापर्यंत घेऊन गेली.हा झाला एक भाग.या प्रकरणाला दुसरी बाजू देखील आहे.भुजबळ आज जी सजा भोगत आहेत त्या सजेला तेच सर्वस्वी जबाबदार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची तसदी कुणी घेत नाही,कायद्याच्या चौकटीत या उत्तराला तितकेसे महत्व नसेलही पण सामाजिक राजकीय न्यायालयात माञ ते उत्तर भुजबळांच्या पदरात न्याय देण्यास पाञ आहे.
ज्यांनी ज्यांनी व्यक्तीगत छगन भुजबळ यांना पाहीले,अनुभवले जाणले तो प्रत्येक जण भुजबळांच्या या अवस्थेवर आश्चर्यमिश्रीत खेद व्यक्त करतांना दिसतो आहे,ज्या गुन्ह्यासाठी भुजबळ स्वतः जबाबदार नाहीत त्या गुन्ह्याची सजा त्यांना भोगावी लागत असल्याचा निष्कर्ष या सार्या घडामोडींमधून निघतो आहे,अर्थात एक गोष्ट माञ इथे नमुद करावी लागेल ती म्हणजे भुजबळ यांनी अंध पणे दाखविलेला विश्वासच या परिस्थितीला जबाबदार आहे.यात गृहखाते,सार्वजनिक बांधकाम ,कञाटदार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सत्ताकाळात सभोवताली जमा झालेला दादा,अण्णा ,भाऊ ,नानांचा गोतावळा .या सार्यांच्या कर्माची फळे भुजबळांना भोगावी लागत आहेत.कायदा आपल्या जागेवर योग्य आहे.परिस्थिती निर्माण होत असतांना सावध करण्याऐवजी गोतावळ्याने स्वार्थासाठी त्यांना परिस्थितीच्या दरीत ढकलले.कोण कोण आहेत या गोतावळ्यात ? दखल तर घ्यावीच लागेल ना!
मुंबई शहर इलाखा-उत्तर मुंबईतही तेवीस टक्क्यांचा व्हायरस
शहर इलाखा आणि उत्तर मुंबई साबां मंडळालाही तेवीस टक्के लाच स्वीकारण्याचा व्हायारसने ग्रासल्याची चर्चा आहे .कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि श्रीमती परदेशी यांनी स्वतःसाठी वीस तर प्रकल्प निधी मंजूरीसाठी तीन टक्के दर ठरविल्याची चार्चा आहे.या हिशेबाप्रमाणे शहर इलाखा विभागात तीस कोटी पैकी जवळपास सात कोटी तर उत्तर मुंबईत जवळपास साडे अकरा कोटीचा लाच व्यवहार झाल्याची वाच्यता आहे. या संदर्भात तपशिलवार दखल उद्यापासून...