Breaking News

आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍याच्या मुलीच्या नावे दहा हजार ची एफ डी करून केला वाढदिवस साजरा

बुलडाणा, दि. 02 -  येथील तहसिलदार वैशाली देवकर यांच्या मुलाचा 29 मार्च रोजी वाढदिवस होता त्यांनी नारखेड येथील आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांच्या  चार वर्षाच्या मुलीच्या नावे दहा हजाराची एफ डी करून तसेच नवीन कपडे खाउ देवुन वाढदिवस साजरा केला. 
नारखेड ता.नांदुरा येथील शेतकरी अनंत तायडे यांनी दोन महिण्या पुर्वीच आत्महत्या केली होतीं त्याचे कडे फक्त एक एक्कर शेती असुन दोन मुली आहेत शासना कडुन मिळणारी आर्थीक मदत सुध्दा त्याला तात्काळ तहसिलदार वैशाली देवकर यांनी मिळवुन दिली. आज तहसिलदार यांचा मुलगा सामरित भुषन गावंडे याचा आठवा वाढदिवस होता. त्यांनी नारखेड येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी अनंत तायडे यांच्या पत्नीला तहसिल कार्यालयात बोलावुन घेतले त्यांची मोठी मुलगी वय चार वर्ष हिच्या नावे सेंटल बँक निमगांव येथील शाखेत 14 वर्षासाठी दहा हजार रूपये फिक्स टाकले व दोन्ही मुलीला नवीन कपडे खाउ आपल्या मुलाच्या हस्ते देवुन त्याचा वाढदिवस साजरा केला एका अधिकार्‍याने आपल्या मुलाचा वाढदिवस अश्या पध्दतीने साजरा करणे ही कदाचित पहिलीच घटना असु शकते म्हणुन तहसिलदार यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.