Breaking News

जमीन संपादनामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी उपोषणाचा ईशारा

बुलडाणा, दि. 26 -  तालुक्यातील कवठळ शिवारात खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाटाकरीता जामीन संपादित होऊन उत्पन्न बुडाले आहे. पाटाचे काम होऊन एक वर्ष झाले आहे. पाटामध्ये जमीन गेल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील दोन्ही उत्पन्न बुडाले आहे. उत्पन्न बुडाल्यामुळे मोबदला मिळावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सदर मागणी पुर्ण न झाल्यास उपोषण करण्याचा ईशारा अंत्री खेडेकर येथील शेतकर्‍यांनी दिला आहे.
कवठळ शिवारात गट नं 195 व 196 मध्ये पाटाचे काम अर्धवट आहे. सदर पाटाचे काम होऊन एक वर्षे झाले. पाटामध्ये जमीन गेल्यामुळे आमची खरीप आणि रब्बी हंगामातील दोन्ही उत्पन्न बुडाले आहे. सतत तिन वर्षो पासुन दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. पाटा करीता जमीन संदादित होऊन उत्पन्न बुडाल्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी. उत्पन्न बुडाल्यामुळे नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणचा ईशारा संजय खेडेकर, रामचंद्र पेढांरकर, कचरू खंडारे, संजय पेंढारकर, किशोर पेंढारकर, बद्री पेंढारकर यांनी दिला आहे.