Breaking News

महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

बुलडाणा, दि. 26 - तालुक्यातील पिंपळनेर येथील घरा बाहेर झोपेत असलेल्या 30 वर्षीय विवाहित महिलेचा 23 एप्रिल च्या सकाळी 4 वाजता वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी लोणार पोलीस स्टेशन ला भा.द.वी.कलम 354,324 नुसार गावातीलच आश्रुबा प्रल्हाद गव्हाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी फरार आहे.
22 एप्रिल रोजी रात्री विद्युत च्या लपंडावाला त्रस्त होऊन तालुक्यातील पिंपळनेर येथील 30 वर्षीय महिला व  सासरे , सासू घराबाहेर बाजेवर झोपले होते. 23 एप्रिल च्या सकाळी 4 वाजता 30 वर्षीय  महिलेचा गावातीलच आश्रुबा प्रल्हाद गव्हाणे याने वाईट उदेशाने हात पकडला .यामुळे जाग आलेल्या  महिलेने आरडाओरडा केली .आरडाओरडा ऐकून शेजारीच झोपलेले सासू,सासरे जागे झाले .त्यांनी आश्रुबा गव्हाणे याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने धक्काबुक्की करत तेथून पळ काढला . फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून लोणार पोलीस स्टेशन ला आश्रुबा प्रल्हाद गव्हाणे यांच्याविरुद्ध भा.द.वी.कलम 354,324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार भाऊसाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.नारायण गीते व ना.पो.कॉ.सुरेश शिंगणे हे करीत आहेत.