Breaking News

महाराजस्व अभियानाचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा - तहसिलदार सुधीर पाटील

अहमदनगर, दि. 05 - महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान 2016-17 अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सर्व विभागांच्या सेवा एकाच छताखाली देण्यासाठी गुरुवार दि.6 एप्रिल 2017 रोजी बुरुडगांव येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग, उपप्रादेशिक परिवहन, कृषी विभाग, अग्रणी बँक, गटविकास पंचायत समितीचे सर्व विभाग, पशुसंवर्धन विभाग, पासबुक योजना, ग्रीन आर्मी योजना आदि विभागाचे विविध प्रकारचे स्टॉलद्वारे सर्वप्रकारचे शासन आदेश, विविध प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहून सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार सुधीर पाटील यांनी केले.
महाराजस्व अभियानांतर्गत सर्व विभागांच्या सेवा एकाच छताखाली देण्यासाठी दि.6 रोजी बुरुडगांव येथे आयोजित केलेल्या  कार्यक्रमाची माहिती वाड्या-वस्त्यावरील नागरिकांना तहसिलदार सुधीर पाटील यांनी दिली. याप्रसंगी प्रा.संतोष यादव, गणेश दरंदले, जालिंदर कुलट, जालिंदर वाघ, अर्जुन मोढवे, अशोक दरंदले, अरुण चव्हाण, बाळासाहेब साबळे, नितीन चव्हाण,  महेश दरंदले, विश्‍वराज शिंदे आदिंसह तलाठी, ग्रामसेवक  उपस्थित होते.
या महाराजस्व अभियानांतर्गत गुरुवार दि. 6 रोजी  जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या कार्यक्रमास खा. दिलीप गांधी, आ.संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच गणेश भोसले, भगवान फुलसौंदर, संदेश कार्ले, श्रीमती स्वाती कार्ले, अभिजित खोसे, सरपंच सौ.पाचारणे यांचाही यासाठी सहयोग असणार आहे.