तलावावर पाणी वापर संस्था स्थापन करणे गरजेचे - पाचपुते
अहमदनगर, दि. 05 - घोडेगाव तलावातून पाणी उपसा करण्यासाठी अधिकृत पाणी वापर संस्था तयार करून या भागातील शेतकर्यांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी घोडेगाव तलावावरील लाभधारक शेतकर्यांच्या बैठकीत बोलताना सांगितले .
सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊ लागला आहे त्यात जलसंपदा विभागाने घोडेगाव तलावावरील विद्धुत मोटारी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे चिंतातुर शेतकर्यांनी माजी मंत्री पाचपुते यांच्याकडे धाव घेतली त्यावर पाचपुते यांनी घोडेगाव तलावावर जाऊन लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या समवेत बैठक घेतली या बैठकीत बोलताना माजी मंत्री पाचपुते म्हणाले ,घोडेगाव तलावात कुकडी चे आवर्तन सुटण्याचा नेहमीच प्रश्न निर्माण होतो कारण शेतकर्यांकडून पाणी पट्टी भरण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे या तलावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी या तलावावर पाणी वापर संस्था स्थापन करून आवर्तनाचा प्रश्न सुटेल संस्था स्थापन झाल्यावर संस्थेच्या माध्यमातून तळ्यात पाणी येईल व सर्व शेतकर्यांना फायदा होईल या संस्थेसाठी शासन दरबारी आपण पाठपुरावा करून उचल पाणी वापर संस्था मंजूर करू असे पाचपुते म्हणाले .
तसेच औटेवाडी तलावाबाबत हि बैठक घेण्यात आली या तलावावर हि पाणी वापर संस्था स्थापन करण्याबाबत चर्चा झाली यावेळी उपस्थित शेतकर्यांनी हि संस्थेबाबत सकारात्मक चर्चा केली तसेच तालुक्यातील सर्वच मोठ्या तलावावर अश्या स्वरूपाच्या संस्था स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे तालुक्यातील पारगाव ,मोहरवाडी ,विसापूर ,उक्कडगाव ,रायगव्हाण ,भावडी ,कोकणगाव ,तांदळी ,टाकळी लोणार, देऊळगाव ,देवदैठण , ढवळगाव आदी तलावावर या संस्था स्थापन करण्यात येणार आहेत डिमांड देऊन पाणी आरक्षित करणे हाच मुख्य उद्देश या संस्था स्थापन करण्यामागे आहे असे पाचपुते म्हणाले.
पाणी वापर संस्था फायद्याची - माजी मंत्री पाचपुते
शेतकर्यांनी जर तलावावर उचल पाणी वापर संस्था स्थापन केली तर याचा फायदा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणांत होईल संस्थेच्या माध्यमातून जर पाणी वाटप झाले तर पाण्याचा वापर योग्य पद्धतीने होईल तसेच शेतकर्यांनी आता ठिबक सिंचन वर भर देणे गरजेचे आहे त्यामुळे या संस्थांना मंजुरी देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री पाचपुते यांनी सांगीतले ,तसेच शेतकर्यांनी जलसंपदा विभागाची थकबाकी भरून जलसंपदा विभागाला सहकार्य करावे असे आवाहन हि पाचपुते यांनी केले.