श्रीराम जन्मोत्सव; शेगांव नगरीत लाखो भक्त नतमस्तक
बुलडाणा, दि. 05 - शेगाव अविरत ओठी घ्यावे नाम ......श्रीराम जय राम जय जय राम....या अभंगाच्या सुरावरित हजारो भाविक आज ता.5 एप्रिल रामरंगात रंगून गेले विदर्भाच्या पंढरीत जय गजानन जय श्रीरामच्या जय घोषात निनांदत होता राज्याच्या कानाकोपर्यातुन तेराशे दिंडयासह चार हजार वारकर्याचा सहभाग होता आलेल्या लाखो भाविकांनी श्रींच्या समाधिवर माथा टेकविला भाविकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे संतनगरी हाउसफुल झाली होती संत गजानन महाराज संस्थानमधे 123 वर्षापूर्वी साक्षात् गजानन महाराजांनी आराध्य दैवत प्रभु श्रीरामचंद्राच्या उत्सवाची परपरा सुरु केली. तेव्हापासून आज पर्यत हीपरंपरा कायम आहे.
रामनवमी म्हणून संपूर्ण विदर्भात या सोहळयाला महत्व आहे. सकाळी 10 वाजता आद्यात्म रामायण स्वाहाकार यागाची पूर्णाहुती व अवभ्रुत स्नान झाले संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील, विश्वस्त निळकंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थित ब्रम्हरुंदांच्या मंत्रोपचारात पूजा झाली सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान ह भ प विष्णुबुवा कव्हळेकर यांचे राम जन्मउत्सवावर काल्याचे कीर्तन झाले. या कीर्तनाचे श्रवण करण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होंते रामजन्मऊत्सव सोहळा सुरु झाला यावेळी भाविकांनी जय गजानन जय श्रीरामचा जयघोष केला.
उत्सवानिमित्य शहरात जिकडे तिकडे रामनामात तल्लीन झाले होते. मंदिरावर आकर्षक विद्धुत रोशनाई करण्यात आली होती जागोजागी केळीच्या खाबामुळे मंदिर परीसरात चैतन्य खुलुन दिसत होते. दुपारी 2 वाजता श्री संत गजानन महाराजांच्या रजत मुखवटयाची पालखी पराक्रमा रथ मेना व गज अश्वासह नगर परिक्रमा लहुजी वस्ताद चौक, दत्तमंदीर, जुने महादेव मंदीर, तिन पुतडे परिसर, फुले नगर, तेलीपूरा, फर्शी मस्जिद, स्वामी विवेकानंद चौक, खेतान चौक, आठवडी बाजार, बस स्थानक, अग्रेसन चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक मार्गे सायंकाळी मंदिरात पोहचली ठीकठिकाणी पालखी सोहळ्या दरम्यान भविकांनी रस्त्यावर स्वागत कमान रांगोळ्या टाकून स्वागत केले सायंकाळी 6 वाजता श्रींचा पालखी सोहळा मंदिरात दाखल झाला श्रीच्या रजत मुखवट्याची शिवशंकरभाऊच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करुण करून सोहळ्याची समाप्ती करण्यात आली.