Breaking News

कवी अरुण म्हात्रेंपुढे सर्व प्रवाह एक होतात - डॉ. सदानंद मोरे

पुणे, दि. 24 - कवितेमध्ये नाना प्रकार असतात, प्रत्येक कवीला त्याचा प्रकार किंवा सादरीकरणाची पद्धत म्हणजेच खरी कविता आहे असे वाटते. मराठी कवितेमध्येही नाना प्रकारचे जात आणि वर्णभेद आहेत मात्र ज्या कवी पुढे सर्व प्रवाह एक होतात, असा मराठीतील एकमेव कवी म्हणजे अरूण म्हात्रे होय, असे गौरवोद्वार ज्येष्ठ साहित्यीक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी काढले. 
रंगत संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाऊंडेशनच्या वतीने णारा ‘काव्य जिवनगौरव पुरस्कारङ्क ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांना डॉ. मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. प्रमोद आडकर, श्यामची आई फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यावेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, अरूण म्हात्रेंमुळे जसे मराठी कवितेमधील ि जातिभेद नष्ट झाले, तसेच त्यांनी स्वःतच्या कविते इतकेच किंवा त्यांनी स्वतःच्या संवेदन इतकेच इतर कविंच्या संवेदनाही समजुन घेतल्या आणि सामान्यता कवी इतरांच्या कविता वाचत नाहीत मात्र म्हात्रे यांनी त्या वाचल्या आणि नवा पायंडा पाडला आहे, तसेच कवी मध्ये जी सांप्रदायीकता निर्माण झाली आहे, तीला छेद दिला आहे. मी संमेलनाध्यक्ष झालो त्यावेळी त्यांनी दुरदर्शनवर माझी मुलाखत घेतली मी 1980-82 च्या काळात लिहिलेली कविता वाचुन त्यांनी मलाही आश्‍चर्याचा धक्का दिला कारण तत्वज्ञानाच्या आणि संत साहित्याच्या व्यापात मी मुळात कवी आहे हे मी देखील विसरलो होते माझी मलाच त्यांनी नव्याने ओळख करून दिली.
सत्काराला उत्तर देताना म्हात्रे म्हणाले, अनेक वर्षे नोकरी करत कवितेचे कार्यक्रम केले, मात्र एका टप्प्यावर असे वाटले की, आपण कवितेचे ऋणी आहोत आपण कवितेसाठी काम केले पाहिजे म्हणुन नोकरी सोडली. आजोबा स्वातंत्र्यसैनिक, वडील संयुक्त महाराष्ट्र चळवलीत असल्याने अनेक दिंग्गजांच्या सानिध्यात मला राहता आले, त्याचा परिणामही माझ्या कवितेवर झाला आहे. सुरेश भट, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके यांच्या सोबतच्या कार्यक्रमातुन मी घडत गेल्याचे त्यांनी नमुद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. ज्योती रहाळकर यांनी केले.