Breaking News

दिल्ली महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज

नवी दिल्ली, दि. 24 - आज झालेल्या दिल्ली महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळेल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. दिल्ली महानगरपालिकांमधील 270 जागांपैकी सुमारे 202 ते 220 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील. आम आदमी पक्षाला 23 ते 35 जागा मिळतील, तर काँग्रेसला 19 ते 31 जागांवर समाधान मानावे लागेल, असे इंडिया टुडे-क्सिस यांच्या मतदानोत्तर चाचणीत सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे सी-व्होटर-एबीपी यांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीच्या अंदाजाप्रमाणे भाजपला 218, आम आदमी पक्षाला 24 तर काँग्रेसला 22 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, 270 जागांसाठी झालेल्या आजच्या निवडणुकीत 54 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त एस.के.श्रीवास्तव यांनी दिली.